रत्नागिरी : रत्नागिरीच्या बांधकाम क्षेत्रात आपल्या गुणवत्तापूर्ण कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘नवलाई ग्रुप’ने नुकत्याच मुंबईतील एका महत्त्वपूर्ण व्यावसायिक व्यासपीठावर मोठी झेप घेतली आहे. ‘एम.बी.एफ.’ (MBF) च्या वतीने नेहरु सेंटर, वरळी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय सेमिनार आणि व्यावसायिक प्रदर्शनात नवलाई ग्रुपने ‘बिझनेसमन एक्सेलेन्स अवॉर्ड’ (Businessman Excellence Award) आणि ‘बेस्ट स्टॉलसाठी प्रथम पारितोषिक’ (First Prize for Best Stall) पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
उद्योगजगताला एकत्र आणणारा मंच:
समाजातील उद्योजक, व्यावसायिक आणि नव्याने सुरुवात (स्टार्टअप्स) करणाऱ्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी एम.बी.एफ.तर्फे हे प्रदर्शन २८ आणि २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातून एकूण ९४ स्टॉल उभारण्यात आले होते.
‘नवलाई’ने सादर केले पर्यायी बांधकाम साहित्य:
या प्रदर्शनात रत्नागिरीतील अग्रगण्य असलेल्या नवलाई ग्रुपचा स्टॉल विशेष आकर्षण ठरला. ‘नवलाई’ने बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले दोन नवे उत्पादन (प्रोडक्ट्स) – ‘प्लास्टर सॅन्ड’ आणि ‘ऑप्टी सॅन्ड’ – सादर केले. हे दोन्ही प्रकारचे सॅन्ड (वाळू) प्लास्टर तसेच बांधकामासाठी उपयुक्त असून, नदी आणि खाडीच्या वाळूला उत्तम आणि टिकाऊ पर्याय म्हणून यांची ओळख करून देण्यात आली. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवलाई ग्रुपच्या उत्पादनांची गुणवत्ता, स्टॉलची मांडणी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे नवलाई ग्रुपला ‘बिझनेसमन एक्सेलेन्स अवॉर्ड’ आणि ‘बेस्ट स्टॉलसाठी प्रथम पारितोषिक’ देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यात (माजी मंत्री, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य) श्री. आशिष शेलार, रिटायर्ड चीफ इन्कम टॅक्स कमिशनर श्री. अरुण पवार, श्री. राजेंद्र घाग, श्री. सुरेश हावरे, श्री. मानसिंग पवार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांचा समावेश होता. या मान्यवरांच्या उपस्थितीत नवलाई ग्रुपला गौरवण्यात आले.
नवलाई ग्रुपने मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 04/Dec/2025














