राजापुरात ७ डिसेंबर पासून ५३ वे विज्ञान प्रदर्शन

राजापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, विज्ञान व गणित मंडळ राजापूर, नाटे-आंबोळगड केंद्र, साखरीनाटे येथील मॉडर्न हायस्कूलतर्फे ५३वे राजापुर तालुका विज्ञान प्रदर्शन ७ते ९ डिसेंबर या कालावधीत शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा विषय ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनाअंतर्गत विविध उपक्रमांचे

आयोजन करण्यात आले आहे. ७ ला सकाळी ९ ते ११ या वेळात विज्ञानदिंडी, दुपारी २ ते ५ या वेळात नोंदणी व प्रदर्शन मांडणी केली जाणार आहे. ८ ला सकाळी ९.३० ते १ या वेळात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी २ ते ५.३० प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धा होणार आहे. ९ डिसेंबरला सकाळी १०.३० वा. विज्ञान प्रतिकृती परीक्षण, दुपारी १.३० वा. पारितोषिक वितरण समारंभहोणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 04/Dec/2025