Mumbai -Goa Highway| मुंबई-गोवा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करणार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिले. राज्यातील अनेक भागात रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीबद्दल शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी, हा प्रकल्प गेल्या १० वर्षांहून अधिक काळ रखडल्याची स्पष्ट कबुलीही दिली.

यामागची कारणमीमांसा करताना त्यांनी, वारंवार कंत्राटदार बदल, भूसंपादनातील अडथळे आणि राज्यस्तरीय विलंब यामुळे हा प्रकल्प रखडला होता. हा प्रकल्प २००९ मध्ये सुरू झाला. परंतु २०१४ मध्ये त्यांनी मंत्रिपद स्वीकारले. तोपर्यंत अनेक मूलभूत समस्या कायम होत्या, याकडे लक्ष वेधले.

एकूण प्रकल्पापैकी सुमारे ८९ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भागांचे काम एप्रिल २०२६ ची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या विलंबासाठी जबाबदार असलेल्या एजन्सींवर कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई ते गोवा हा प्रमुख मार्ग सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक असावा, जेणेकरून पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होईल, असे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

प्रवास करणे शक्य होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी स्पष्ट केले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे.

या नवीन बॅरियरलेस टोलिंग तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा नाहीसे होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल. नवीन प्रणालीची सुरुवात सध्या १० ठिकाणी करण्यात आली आहे आणि एक वर्षाच्या आत ती संपूर्ण देशात लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की, सध्या देशभरात सुमारे ४,५०० महामार्ग प्रकल्प सुरू आहेत. त्यांची एकूण किंमत अंदाजे १० लाख कोटी रुपये आहे. आधी टोल प्लाझावर गाड्यांना थांबून रोख किंवा कार्डने पैसे भरावे लागत होते. नंतर फास्टॅग आल्याने थांबण्याचा वेळ कमी झाला. आता पुढील पाऊल बॅरियर लेस म्हणजेच बॅरियर नसलेल्या हायटेक टोलच्या दिशेने आहे.

महामार्गावरील टोल बूथ हटणार
महामार्गावर टोल देण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. कारण देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली आता एक वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:48 AM 05/Dec/2025