लांजा : नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रांग रूमच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. याचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर मतपेट्या सध्या लांजा नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी स्ट्रॉग रूम बनविण्यात आला आहे. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस दलाचे (कोल्हापूर) १० हत्यारी जवान याठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय १० पोलिस कर्मचारी (हत्यारी) २४ तास डोळ्यात तेल घालून सुरक्षा देत आहेत. त्यांच्यावर प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक देखील लक्ष ठेवून आहेत दरम्यान, रविवारी २१ डिसेंबरपर्यंत मतपेट्या ठेवलेल्या या स्ट्रॉग रूमल सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जॅमर, सीसीटीव्ही बसवा…
चिपळूण पालिकेच्य निवडणुकीनंतर मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मित्रपक्षांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकार यांच्याकडे निवेदन दिले आहे. मतदान यंत्रणा ठेवलेल्या स्ट्रॉग रूम्सच्य सुरक्षेमध्ये वाढ, नेटवर्क जॅमर बसवणे सीसीटीव्ही कव्हरेजची मागणी आणि मतमोजणीच्या दिवशी संचारबंदी लाग करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्य बैठकीला माजी आमदार रमेश कदम शिरीष काटकर, फैसल कास्कर, मोहन मिरगल, निहार गुढेकर, शहर अध्यक्ष रतन पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 05/Dec/2025













