खेड : बसस्थानकात वृद्धाचे १४ हजार लंपास करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

खेड : येथील बसस्थानकातील सुलभ शौचालयानजीक एका वृद्ध प्रवाशाला खाली पाडत त्यांच्या खिशातून १४ हजार रु. चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या येथील पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या.

उमेश सदानंद उतेकर (चाकाळे-देऊळवाडी खेड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली १४ हजाराची रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली. नथुराम धर्मा धोत्रे (५०, रा. मोरवंडे-बौद्धवाडी, खेड) बसस्थानकातील सुलभ शौचालयात गेले असता चोरट्याने त्यांना धक्का मारत खाली पाडून त्यांच्या खिशातील १४ हजार रु. लंपास करत पोबारा केला होता. पोलिसी खाक्या दाखवता चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 26/Oct/2024