रत्नागिरी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी वितरित करावयाचे अन्नधान्याचे मासिक नियतन प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २० किलो व गहू प्रती शिधापत्रिका १५ किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यसंख्या प्रतिसदस्यांकरिता तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू, असा बदल करण्यात आला आहे. हा बदल जानेवारी २०२६ पासून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यांसाठी लागू असणार आहे. डिसेंबर २०२५ साठी पूर्वीचेच प्रमाण म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २५ किलो व गहू प्रती शिधापत्रिका १० किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रतिसदस्यांकरिता चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे आहे.
त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, याची सर्व रास्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांनी नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 06/Dec/2025














