IND vs SA, 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी (६ डिसेंबर) खेळला जात आहे. मालिकेतील हा निर्णायक सामना असून विशाखापट्टणमला खेळला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी दोन्ही संघांना आहे, कारण सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघ वनडेत सलग २० नाणेफेक हरल्यानंतर अखेर नाणेफेक जिंकली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये भारताने वनडेत अखेरची नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात भारताने २० नाणेफेक हरल्या.
दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला आहे. भारताने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर तिलक वर्माला संधी देण्यात आली आहे नाणेफेक हरल्यानंतर अखेर नाणेफेक जिंकली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये भारताने वनडेत अखेरची नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात भारताने २० नाणेफेक हरल्या.
दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला आहे. भारताने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर तिलक वर्माला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेला सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले आहेत. त्यांचे नांद्रे बर्गर आणि टोनी डी झोर्डी यांना तिसऱ्या वनडेतून दुखापतींमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे ते हा सामना खेळण्यासाठी उपलब्ध नाहीत. याशिवाय कागिसो रबाडाही अद्याप त्याच्या दुखापतीतून पूर्ण सावरला नसल्याने तिसऱ्या वनडेसाठीही उपलब्ध नव्हता. दरम्यान बर्गर आणि झोर्डी यांच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेने रायन रिकल्टन आणि बार्टमन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका – रायन रिकल्टन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), तेंबा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रिट्झके, एडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सिन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन
वर्षातील अखेरचा वनडे सामना
भारतासाठी हा २०२५ वर्षातील अखेरचा वनडे सामना आहे. त्यामुळे वनडेमध्ये वर्षाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 06/Dec/2025














