Ratnagiri : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाकरिता 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सहा महिन्यांचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 पासून रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सुरू होत आहे. या प्रशिक्षणसाठी 29 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष, उमेदवार किमान चौथी पास, क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव आवश्यक आहे. प्रशिक्षणाचे शुल्क प्रतिमाह 450 रुपये याप्रमाणे सहा महिन्यांचे 2 हजार 700 रुपये व दारिद्र्यरेषेखालील उमेदवारांसाठी प्रतिमाह 100 रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 600 रुपये आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत, दारिद्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 06/Dec/2025