रत्नागिरी : जिल्ह्यातील २ हजार ८९६ बालिकांना राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.
लेक लाडकी’ योजना राज्य शासनाने बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी लागू केली आहे. वार्षिक उत्पन १ लाख रुपयपिक्षा कमी असणाऱ्या तसेच पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन, शिक्षणाला चालना, कुपोषण कमी करणे, मुलींचा मृत्युदर घटवणे आणि बालविवाह रोखणे हे प्रमुख उदिष्ट ठेवण्यात आले आहेत.
योजनेमध्ये टप्प्याटप्याने आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत बालिकेला दिले जाणार आहे. जन्मानंतर ५ हजार, पहिलीला प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीला ७ हजार, अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये, अशा प्रकारे एकूण १ लाख १ हजार रुपांच्या लाभार्थी लाभाची मदत जिल्ह्यातील बालिकांसाठी आहे. योजना मोठा दिलासा मानली जात असून, मुलीच्या शिक्षणात, जीवनमानात सकारात्मक बदल घडले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:42 PM 06/Dec/2025














