चिपळूण : पुण्यातील फुले वाडा कोणत्याही व्यक्ती वा संघटनेला चालविण्यास देऊ नये, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड राज्यभर आंदोलन छेडेल, अशा इशाऱ्याचे निवेदन सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासाठी तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाडा हा भाडेतत्वावर समता परिषदेकडे चालविण्यास द्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे. मात्र महात्मा फुले वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि देशाचा प्रत्येक नागरिक हा त्याचा वारस आहे. महात्मा फुले हे काही कोण्या जातीपुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे भुजबळ यांनी महात्मा फुले यांना खासगी मालमत्ता समजू नये. त्यामुळे हा वाडा भाडेतत्त्वार कुठलीही व्यक्ती अथवा संस्थेकडे देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष स्नेहल चव्हाण, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, जिल्हा खजिनदार शिवानी भोसले, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे आदी उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 08/Dec/2025














