Rajapur : सौंदळ रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत

पाचल : सौंदळ रेल्वेस्थानकाला हॉल्ट स्टेशन म्हणून मंजुरी देण्यात आली आहे; परंतु या स्थानकावर कसलीच सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी या रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करावी, अशा मागणीचे निवेदन बागवेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन दिले आहे

सौंदळ रेल्वे स्टेशन हे गैरसोयीचे स्थानक बनले. या स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची प्रवास करताना मोठी गैरसोय होत आहे. फलाटावर शौचालय तसेच पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच कोकण कन्या किंवा राज्यराणी (तुतारी) एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांपैकी एका गाडीला थांबा द्यावा, अशी मागणीही केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 09/Dec/2025