राजापूर : तालुक्यातील शेढे येथील श्री ब्राह्मणदेव व श्री नवदेवीचा जत्रोत्सव ११ ते १३ डिसेंबर असे तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जत्रोत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता देव-देवतांची विधीवत पूजा, १० वाजता श्री ब्राह्मणदेव श्री आई नवलादेवी स्तुतीप्रिय गीताचे प्रसारण, दुपारी १.३० ते ३.३० पर्यत महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची, ९ वा. परंपरा, संस्कृती, अभिमान, राजापूर तालुक्यात गाजलेलं असे बालकलाकारांचे ढोल वादन, रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम गावातील मुलांचे एकेरी नृत्य व समूहनृत्य एकांकिकांचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच १२ रोजी ७ वाजता सर्व देवी देवतांचे अभंग्यस्नान व पारंपरिक पध्दतीने मुखवटे लावणे, पालखी सजविणे, दुपारी १ ते ३.३० वाजेपर्यत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू, ६ वाजता स्थानिक सुस्वर भजनांचा कार्यक्रम, रात्री ११ वा. विशेष कार्यक्रम विनोदी मालवणी दोन अंकी धम्माल नाटक फुर्वझ, तर १३ रोजी दुपारी २ वा. महानैवेद्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 09/Dec/2025












