प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दापोलीत २२१ घरकुलांना मंजुरी

दापोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळत असून, मंजुरीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात तालुक्यास एकूण २ हजार ६६७ घरकुले मंजूर झाली होती, तर २०२५-२६ आर्थिक वर्षात २२१ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंजूर घरकुलांपैकी अनेक लाभार्थ्यांची बांधकामे पूर्णत्वास जात आहेत, तर काही घरकुले प्रगतीपथावर आहेत. संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समिती स्तरावर निर्देशानुसार कामे सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी वेळेवर जमा होणे, तांत्रिक पडताळणी वेगाने होणे आणि बांधकामकामांना गती मिळणे या गोष्टींसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही समजते. दापोली तालुक्यातील घरकुल योजनांचे प्रभावीपणे नियोजन करून अधिकाधिक कुटुंबांना यातून लाभमिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:50 PM 09/Dec/2025