दापोली : तालुक्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून होत असलेले चढ उतार थांबले असून, आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. मंगळवारी सकाळी दापोलीत किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
दिवसाच्या वेळी उन्हाची ऊब जाणवत असली तरी सकाळी व संध्याकाळी गारठा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. तापमानात घट होत असल्याने व्यायामप्रेमींसह शेतकरी वर्ग हिवाळ्याचा आनंद घेत आहेत. हंगामी आजारांपासून बचावासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 AM 10/Dec/2025














