खेड : खेड-दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या वातानुकुलित इलेक्ट्रिक बसला पाठीमागून डंपरने धडक दिल्याने बसचे मोठे नुकसान झाले. हा अपघात खेड बसस्थानका शेजारीच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
ही इलेक्ट्रिक बस (एमएच-३९ बीझेड-८८२७) दापोलीहून खेडच्या दिशेने येत होती. त्याचवेळी भरणे येथून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरचा मागील भाग बसच्या उजव्या बाजूस घासून गेला. या धडकेत बसची काच फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे खेड-दापोली मार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 10/Dec/2025














