आधार कार्डाला ‘जन्म तारखेचा’ पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : भारतात राहण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपल्यातडे अनेक महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कामासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी अनेक महत्त्वाची कागदपत्र आहे, ज्याशिवाय अनेक कामं ठप्प होऊ शकतात.

यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.

आधार कार्ड हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं दस्तऐवज आहे. भारतातील जवळपास 90 टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे.

अनेक लोक, अनेक ठिकाणी आधार कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर करतात. त्यामुळे अनेकजण आधार कार्डाला जन्मतारखेचा पुरावाही मानतात. तुम्हीही बर्थ प्रुफ म्हणून आधार कार्ड वापरत असाल, तर थांबा, तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

अलिकडेच एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल जाहीर करताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने आधार कार्डबाबत हा निर्णय दिला आहे.

मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यासंदर्भातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड न स्वीकारण्याबाबत हा निर्णय दिला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं यापूर्वी आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा मानलं होतं.

परंतु, सर्वोच्च न्यायालयानं जन्मतारखेचा पुरावा म्हणून फक्त शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच, School Leveing Cirtificate स्वीकारलx आहे. या प्रकरणात, कनिष्ठ न्यायालयानं जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला वैध दस्तऐवज मानला होता.

UIDAI म्हणजेच, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आधार कार्डासंदर्भात एक अधिसूचना जारी केली होती.

ज्यामध्ये, आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणून वापरता येईल असं सांगण्यात आलं होतं. तसेच, जन्मदाखला म्हणून वापरता येणार नाही, असं सांगितलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 26-10-2024