Holidays 2026 : सरकारी सुट्ट्यांची यादी जाहीर! नव्या वर्षात असणार 24 सुट्ट्या पाहा संपूर्ण यादी

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी महाराष्ट्र सरकारनं नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. वर्षभरात २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

राज्य सरकारडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवस यांचा समावेश आहे. यादीत देण्यात आलेल्या सुट्ट्या या महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कार्यालयं, राज्य सरकारचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना लागू असणार आहे.

फक्त बँकांसाठी १ एप्रिल २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. वार्षिक लेखापरीक्षणासाठी ही सुट्टी असणार आहे. तर यंदा महाशिवरात्री, लक्ष्मीपूजन हे रविवारी आहे. तर महाराष्ट्र दिन व बुद्ध पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन हे एकाच दिवशी आहेत

सार्वजनिक सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन – सोमवार, २६ जानेवारी २०२६

महाशिवरात्री- रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

छत्रपती शिवाजी महाराज जयंती- गुरूवार, १९ फेब्रुवारी २०२६

होळी (दुसरा दिवस) – मंगळवार, ३ मार्च २०२६

गुढी पाडवा- गुरूवार, १९ मार्च २०२६

रमझान ईद (ईद-उल-फित्र)- शनिवार, २१ मार्च २०२६

रामनवमी- गुरूवार, २६ मार्च २०२६

महावीर जन्म कल्याणक- मंगळवार, ३१ मार्च २०२६

गुड फ्रायडे- शुक्रवार, ३ एप्रिल २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- मंगळवार, १४ एप्रिल २०२६

महाराष्ट्र दिन- शुक्रवार, १ मे २०२६

बुद्ध पोर्णिमा- शुक्रवार, १ मे २०२६

बकरी ईद (ईद-उल-झुआ)- गुरूवार, २८ मे २०२६

मोहरम- शुक्रवार, २६ जून २०२६

स्वातंत्र्य दिन- शनिवार, १५ ऑगस्ट २०२६

पारशी नववर्ष दिन- शनिवार, १५ ऑगस्ट २०२५

ईद-ए-मिलाद- बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

गणेश चतुर्थी- सोमवार, १४ सप्टेंबर २०२६

महात्मा गांधी जयंती- शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६

दसरा- मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)- रविवार, ८ नोव्हेंबर २०२६

दिवाळी (बलिप्रतिपदा) – मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६

भाऊबीज- बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ (अतिरिक्त सुट्टी)

पारशी नववर्ष दिन- शनिवार, १५ ऑगस्ट २०२५

ईद-ए-मिलाद- बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

गणेश चतुर्थी- सोमवार, १४ सप्टेंबर २०२६

महात्मा गांधी जयंती- शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६

दसरा- मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)- रविवार, ८ नोव्हेंबर २०२६

दिवाळी (बलिप्रतिपदा)- मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६

भाऊबीज- बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ (अतिरिक्त सुट्टी)

गुरू नानक जयंती- मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६

ख्रिसमस- शुक्रवार, २५ डिसेंबर २०२६

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 10/Dec/2025