नवी दिल्ली : भारत-अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी उभय देशांच्या शिष्टमंडळाची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी भारताचे वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी अमेरिकेचे व्यापार विभागाचे उच्चाधिकारी रीक स्वित्झर यांची भेट घेतली.
यावेळी कराराबाबत आतापर्यंत झालेल्या चर्चेतील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या कराराचा दोन्ही देशांना कसा फायदा होईल आणि परस्परांमध्ये आर्थिक संबंध कसे वृद्धिंगत होतील, यावर या चर्चेत भर देण्यात येणार आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने समाजमाध्यमावर दिली आहे.
उभय देशांनी फेब्रुवारीपासून या प्रस्तावित करारावर चर्चेला सुरुवात केली असून चर्चेचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत यासंदर्भात दोन्ही देशांतील शिष्टमंडळांच्या सहा बैठका पार पडल्या आहेत. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतीय उभय देशांनी फेब्रुवारीपासून या प्रस्तावित करारावर चर्चेला सुरुवात केली असून चर्चेचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत यासंदर्भात दोन्ही देशांतील शिष्टमंडळांच्या सहा बैठका पार पडल्या आहेत.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क लावल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. अमेरिकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भारतीय तांदळावरही आयातशुल्क वाढवण्याचा इशारा अमेरिकेने नुकताच दिला आहे. अमेरिकेने सुरुवातीला भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क लावले आणि त्यानंतर युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केल्याप्रकरणी त्यात आणखी २५ टक्क्यांची भर घातली. ही अवाजवी आयातशुल्क आकरणी पहिल्या टप्प्यातील चर्चेचा प्रमुख मुद्दा राहील, असे भारताने नमूद केले आहे. भारतीय शिष्टमंडळात वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव दर्पण जैन यांचा, तर अमेरिकन शिष्टमंडळात दक्षिण-मध्य आशिया व्यापार विभागाचे अधिकारी ब्रेंडन लिंच यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 AM 11/Dec/2025














