चिपळूण : मध्यंतरीच्या काळात अतिशय सक्षमपणे काम करणारी अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली; परंतु नव्याने ती सुरू करण्यात आली. अवघ्या वर्षभरातच या शाखेने विविध उपक्रम राबवले आहेत. कमी कालावधीत चिपळूणची शाखा सक्षम झाल्याचे समाधान आहे, अशी भावना अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
चिपळूण येथे गेला माधव कुणीकडे, या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आलेल्या प्रशांत दामले यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखा कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, योगेश बांडागळे, सचिव डॉ. मीनल ओक आदी उपस्थित होते. या वेळी प्रशांत दामले यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांना मार्गदर्शन केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीमध्ये नाट्य परिषदेचे एक कार्यालय आहे. त्यामुळे नाट्यगृहावर लक्ष ठेवणे ही आपलीही जबाबदारी आहे. नाट्यगृह स्वच्छ राहिले पाहिजे. येथील वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, ही जबाबदारी नाट्यप्रेमीसह नाट्य परिषदेचीही असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 26/Oct/2024









