Ratnagiri : पीएम किसानचा २१ वा हप्ता; दीड लाख शेतकऱ्यांना किसान योजनेचा लाभ

रत्नागिरी : केंद्राच्या वतीने पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हप्ता आला असून १ लाख ५६ हजार १४४ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ३१ कोटी २२ लाख ८८ हजार रूपये जमा झाले आहेत. तर ग्रामीण भागातून अनेक शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे पीएम किसान सन्मान योजनेतून १ लाख ७२ हजार ५५८ शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. आधार, ई-केवायसीचाही फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकाने किसान सन्मान योजना सुरू केली. मात्र योग्य व्यक्तींना याचा लाभ मिळावा म्हणून केवायसीसह इतर नियम लावण्यात येत आहे. याचा फटका जिल्ह्यतील पावणेदाने लाख शेतकऱ्यांना बसला आहे. कित्येकजण शहरसोडून इतर जिल्ह्यात स्थायिक झाले आहे.

तसेच अधिकारी केवायसीसाठी आग्रही असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने शेतकरी आवश्यक प्रक्रिया करण्याबाबत उत्साही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे काहींचे केवायसी नसल्यामुळे नावे वगळण्यात आली आणि लाभापासून वंचित राहिले आहेत.

जिल्ह्यातील पावणेदोन लाख लाभार्थी वगळले किसान सन्मान योजनेसाठी केवायसीसह इतरबाबी पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र विहीत प्रक्रिया पूर्ण न झालेले जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ५५८ शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांची केवायसी पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.

चिपळूण, संगमेश्वरच्या शेतकऱ्यांची बाजी
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभा घेणारे चिपळूण, संगमेश्वर येथील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. चिपळूण येथील २२,५७५, संगमेश्वर येथील २०,४६५ शेतकरी २१ व्या हप्त्यासाठी पात्र ठरले. तर सर्वात कमी ६ हजार २२२ शेतकरी मंडणगड तालुक्यातील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 11/Dec/2025