रत्नागिरी : अलीकडच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इ. सेवांशी संबंधित बनावट वेबसाईटस्, फसवे मोबाईल अॅप्स (एपीके) मोबाईल एसएमएस, व्हाटस्अॅपद्वारे पाठवल्या जाणाऱ्या खोट्या लिंक मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवत आहेत. यामुळे सर्व चालक, मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांनी फसव्या लिंक, वेबसाईट, खोट्या ई चलनाच्या लिंकपासून सावधान रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
परिवहन विभागाच्या बनावट साईट, लिंक नागरिकांनी उघडू नये. सर्व अधिकृत संकेतस्थळे गव्ह. इन ने समाप्त होतात. कॉम, ऑनलाईन, साईट, इन अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाईट नागरिकांनी उघडू नये. वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते, अनधिकृत लिंक पाठवण्यात येऊन त्वरीत दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात, वाहन चालवण्याचा परवाना सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा फसवणूक करणाऱ्यांकडून संदेश हे पाठवतात. आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही व्हॉटस्अॅपद्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाहीत असेही सांगण्यात आले.
… तर यावर संपर्क करा
आरटीओ सर्व्हिस एपीके, एमपरिवहन, अपडेट एपीके, ई-चलन, पेएपीके अशा अनधिकृत एपीके अॅप्स डाउनलोड करू नयेत. कारण त्याद्वारे ओटीपी, बैंकिंग माहिती व मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश, लिंक प्राप्त झाल्यास नॅशनल सायबर क्राईम पेट्रोल, फसवणूक झाल्यास १९३०, सायबर पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 12/Dec/2025














