Ratnagiri : बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून रस्त्याच्या डाव्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वा. निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरील आगरनरळ येथे एका हॉटेलसमोर घडली. अरमान सरवल अली (वय २८, रा. गणेश नगर तुर्भे नाका, सानपाडा ठाणे, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात उदय मनोहर कुलकर्णी (३८, रा. विनायक निवास शिवराज ढाब्या मागे कुमठे फाटा, कोरेगाव, सातारा) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित ट्रक चालक अरमान अली हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक (एमएच-४६-बीयु-४३०७) घेउन निवळी ते जयगड असा भरधाव वेगाने जात होता. तो आगरनरळ येथील हॉटेल मनीषासमोर आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या डाव्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रक (टीनएन-७०-एसी-०४५७) ला पाठीमागून धडक देत अपघात केला. या अपघातात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले आहे. संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ मोटार वाहना कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 12/Dec/2025