Ratnagiri : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या योजनांची जनजागृती

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखवला.

यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती घटकातील लाभाथ्यर्थ्यांसाठी शासनाच्या विविध असणाऱ्या योजना यांची माहिती या एलईडी व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाध, कन्यादान योजना, स्टैंडअप योजना, कृषी स्वावलंबन योजना, दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम, रमाई आवास योजना, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता योजना, स्वाधार योजना यांचा समावेश असणार आहे.

त्याचबरोबर कृषी, आरोग्य, वन विभाग, महसूल विभाग, कौशल्य विकास आदींचा समावेश आहे. रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष जनजागृत्ती अंमली पदार्थापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्स अंतर्गत मोहीम सुरु केली आहे. सायबर गुन्हे घडू नयेत, फसवणुकीपासून नागरिकांनी दूर रहावे, याबाबत जनजागृतीपर संदेश, सायबर फसवणूक व त्यापासून काय काळजी घ्यावी, याबाबतही या जनजागृत्ती मोहिमेत विशेष माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 12/Dec/2025