गुहागर : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे वाहन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी बुधवारी मध्यरात्री पकडले आहे. या प्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पालशेत येथे अवैध वाळू उपसा जोरदार सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल गुहागर महसूल विभागाने घेतली आहे.
तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा मिनी टेम्पो बुधवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वा. पालशेत नाक्यात तपासणी दरम्यान पकडण्यात आला. यामध्ये अर्धा ब्रास वाळू असल्याचे समोर आले आहे. येथील तलाठी पाटील, मंडळ अधिकारी कानिटकर यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अवधूत मनोहर चव्हाण (रा. पालशेत) यांचे वाहन अर्धा ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गस्तीची टीप नि वाहने गायब…
दरम्यान, गुहागर समुद्रकिनारी अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना अगोदरच तेथील वाहने गायब होत असल्याचे व आपण पोहोचण्यापूर्वीच त्यांना आपण येत असल्याची माहिती कळत आहे. यामागे मोठे नेटवर्क असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे या गस्तीची टीप कोण देतो तसेच वाळू उपसावर करडी नजर असल्याचे महसूल विभागाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 12/Dec/2025














