मंडणगड : दिवाळी चार दिवसांवर आली आहे; मात्र तालुक्यातील शेतकरी शेतात भात कापणी कामांत व्यस्त असल्याने त्याचा थेट परिणाम हा मंडणगड तालुक्यातील मुख्य बाजारपेठांवर झाला आहे. शेतीची कामे पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागांतील नागरिकांनी खरदेसाठी अजून आपली पावले शहराकडे वळवली नाहीत. परिणामी, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजलेल्या बाजारपेठा सुन्या वाटत आहेत.
परतीचा पाऊस लांबल्याने शेतीची कामे खोळंबली, गुरुवारपासून पावसाने उघडीप दिल्याने दिलासा मिळालेला शेतकरी दिवसभर शेतात आहे. तयार पीक कापणी करून घरी आणण्यासाठी लगबग असून, धान्य वाचवण्याचा धडपड सुरू आहे.
तसेच नजर आकाशाकडे लागली आहे. मंडणगड शहर, देव्हारे, कुंवळे, म्हाप्रळ या बाजारपेठेत ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक गर्दी करत असतात; मात्र ते अजूनही शेतीकामात व्यस्त असल्याने बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येते. दुकानातून विविध प्रकारांचे रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फटाके विक्रीला ठेवण्यात आले आहेत. कपडे, रंगीबेरंगी रांगोळ्या, आकर्षक पणत्या, दिवे, तोरण, लटकते तोरण, पर्स, बँगा, रांगोळीचे छाप, चप्पल अशा अनेकविध साहित्याने बाणकोट रोड, नगरपंचायत संकुल, भिंगळोली रोडवरील दुकाने सजवण्यात आली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 26/Oct/2024














