Horoscope Today 13 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 13 डिसेंबर 2025 चा आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जाऊन शनि देवाची पूजा करतात. मोहरीचं तेल तसेच, काळ्या वस्तू अर्पण करतात. तसेच, आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
मेष रास
मेष राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. तुमच्या कामाच्या गतीवर देखील परिणाम दिसून येईल. तसेच, जे तरुण आज जॉब इंटर्व्ह्यूसाठी जातील त्यांना सकारात्मक बदल दिसतील.
वृषभ रास
वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. तुमच्या वैवाहिक जीवनात छान स्थिरता दिसून येईल. एकमेकांना सपोर्ट कराल.तसेच, धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची वाढलेली दिसेल.
मिथुन रास
तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतायत असं तुम्हाला वाटेल. पण कामाच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तुमचे विरोधक तुमचा सूड घेण्यास तयार असतील. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल.
कर्क रास
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्तीची भरभराट होईल. आज मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात फार उत्तम असमार आहे. आज तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळले. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.
कन्या रास
कन्या राशीच्या दिवसाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतायत. महत्त्वाची कामे करण्यात वेळ दवडू नका. तसेच, घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:40 AM 13/Dec/2025














