रत्नागिरीकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद; नगरपरिषदेची महत्वाची सूचना

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी (दि. १५ डिसेंबर २०२५) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेच्या (Ratnagiri Nagar Parishad) पाणीपुरवठा विभागाने अधिकृत सूचना जारी केली आहे.

नेमके कारण काय?

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा व्यवस्थेची नियमित आणि प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्ती (Preventive Maintenance) करणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि भविष्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक १५/१२/२०२५ रोजी शहरात पाणीपुरवठा होणार नाही.

नागरिकांना आवाहन

पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रविवारीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मंगळवारी पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता असली तरी, पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 13/Dec/2025