करंबेळेतर्फे संगमेश्वर येथील श्रीदेव गांगोबा मंदिरात विद्युत सेवा

साडवली : करंबेळे तर्फे संगमेश्वर येथील स्वयंभू श्री देव गांगोबा, वाघजाई, निनावी देवी मंदिर गेली अनेक वर्षे विजेच्या प्रतीक्षेत होते. आता या मंदिरात विद्युत सेवा नुकतीच सुरु झाली आहे. येथील गावकरी व मानकरी मोठ्या भक्तीभावाने या मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम घेतात. या मंदिरात लाईटची सेवा नसल्याने मंदिरात रात्रीच्यावेळी ग्रामस्थांना कार्यक्रम घेताना अनेक अडचणी यायच्या. गॅस बत्ती किंवा जनरेटर अशी साधने आणून हे कार्यक्रम साजरे केले जायचे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ मंदिरात विद्युत सेवा सुरु व्हावी यासाठी धडपड करत होते. अखेर याला यश आले आहे.

येथील गावकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महावितरण कोसुंब शाखेच्यावतीने या ठिकाणी नुकतीच वीज जोडणी करण्यात आली आहे. डोंगराळ भागातून ११ जवळपास २४ पोलची नवीन लाईन उभारून मंदिराशेजारी डीपी स्ट्रक्चर उभारून सदर विद्युत पुरवठा महावितरण कंपनीतर्फे करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 13/Dec/2025