चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी शंकरवाडी येथे खैराच्या झाडाखाली दारू विकत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी धाड टाकून एकावर गुन्हा दाखल केला आहे. आशिष सुधाकर चाळके (३०, रा. चिंचघरी शंकरवाडी) याला अटक केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल विशाल घाडगे यांनी ही धाड टाकली. यामध्ये गावठी हातभट्टीची दारू बेकायदा बाळगून विनापरवाना विक्री करीत असतानाच आशिष सुधाकर चाळके हा पोलिसांना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून ९४० रुपयांची ५ प्लास्टिकचे कॅन व ९ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 15/Dec/2025














