Ratnagiri : कारवांचीवाडी येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

प्रतीक सीताराम कातळकर (३२, रा. आदिशक्ती आकाशवाणी केंद्राचे मागे कारवांचीवाडी पोमेंडी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रतीक हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे एमआयडीसी येथील गडकरी ट्रेडर्समध्ये नोकरीला गेला होता. त्यानंतर दुपारी तो घरी जेवण्यासाठी आला होता. दुपारचे जेवण केल्यानंतर तो शौचालयात गेला होता. त्यावेळी शौचालयातून श्वास घेण्याचा मोठ्याने आवाज आल्याने त्याची आई ज्योती कातळकर यांनी प्रतीकला बाहेरुन मोठ-मोठ्याने आवाज दिला; परंतु आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी शौचालयाचा दरवाजा ढकलून उघडला असता त्यांना प्रतीक बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. प्रतीकचे वडील सीताराम कातळकर आणि इतर नातेवाईकांनी मिळून प्रतीकला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना प्रतीकचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 15/Dec/2025