WWE star John Cena retires : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) च्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आज संपुष्टात आले. ‘यु कॅन्ट सी मी’ चा नारा देणारा आणि तब्बल १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने आज (रविवार, १४ डिसेंबर २०२५) कुस्तीच्या रिंगमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली.
‘सॅटर्डे नाईट मेन इव्हेंट’मध्ये सीना यांनी आपला शेवटचा मुकाबला ‘द रिंग जनरल’ गुंथर विरुद्ध केला. या अत्यंत भावनिक आणि कठोर संघर्षानंतर गुंथरने सीनाला टॅप आऊट करण्यास भाग पाडले. जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत जॉनसीनाला टॅप आऊट होण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे एरिनामधील चाहते निराश झाले, पण त्यांची जुनी कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहिली.
जॉन सीना याचा ‘अलविदा’
जॉन सीना यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आज (१४ डिसेंबर २०२५) अधिकृतरित्या निवृत्ती घेतली. याआधीच सीना याने व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले होते की, WWE मधून आपण निवृत्ती घेणार आहोत पण हा निरोप त्वरित नसून, २०२५ हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचे असेल. या काळात ते चाहत्यांसाठी अनेक ‘अंतिम’ सामने खेळतील त्यानुसार, तो आज अंतीम सामना खेळला व अधिकृतरित्या निवृत्त झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 15/Dec/2025














