रत्नागिरी : भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आयएनएस विक्रांत या एअरक्राफ्ट कॅरिअर युद्धनौकेचे तब्बल ३७ फूट लांबीचे मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात आले असून, हे मॉडेल कोलकाता शिपयार्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील शिप मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रत्नागिरीतील मयुर वाडेकर या तरुणाने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने या जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे पाटीलवाडी येथे या तरुणाने एनसीसी विद्यार्थी व सहकाऱ्यांच्या मदतीने मयूर वाडेकर याने विक्रांतचे मॉडेल तयार केले आहे.
यापूर्वी त्याने आयएनएस कुकरी व अन्य भारतीय लढावू जहाजांचीही प्रतिकृती तयारी केली आहेत. यापूर्वी त्याने तयार केलेल्या प्रतिकृती या विशाखापट्टनम, गोवा, कोलकाता, दिल्ली याठिकाणी रक्षा मंत्रालय व नौसेनेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दौऱ्यादरम्यानही त्याने तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
मागील एक महिन्यापासून विक्रांतची प्रतिकृती तयार करण्याचे काम रत्नागिरीत सुरु होते. भारतातील ही सर्वात मोठी प्रतिकृती असणार असून या पूर्वी १२ फुटाच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. यासाठी जवळपास १४ लाखांचा खर्च आला आहे. मयुर वाडेकर याच्यासह नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, दानियल सारंग, निहारीका राऊत, फहद लाला, अर्ष फणसोपकर, निखिल गावकर, संपदा हर्डीकर यांच्यासह एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. विक्रांतची ही प्रतिकृती रत्नागिरीतून विशाखापट्टणममार्गे कोलकाता येथे रवाना करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 16/Dec/2025














