Chiplun : कंटेनर भरधाव चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चिपळूण : महामार्गावरील परशुराम घाटातून भरधाव वेगाने धोकादायक स्थितीत गाडी चालवणाऱ्या कंटेनर चालकाला शुक्रवारी दुपारी २ वाजता चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. विकासकुमार हरेंदर दास (२४, रा. बडाबडैय्या, बरोली, गोपालगंज, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

कंटेनरचालक विकासकुमार दास हा आपल्या ताब्यातील कंटेनर लोटेहून पशुराम घाटातून गोव्याच्या दिशेने चालला होता. मात्र परशुराम घाटातील तीव्र उतार, रहदारी व विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता वळणावळणावर अतिशय धोकादायक स्थितीत दास हा कंटेनर चालवत होता. चिपळूण पोलिस या मार्गावर गस्त घालत असताना तो आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलिस हेड कॉन्स्टेंबल विनोद आंबेरकर यांनी दिली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 16/Dec/2025