माखजन : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता लाखण यांची निवड झाली आहे. गेले काही महिने बुरंबाड ग्रामपंचायतीचे सरपंच पद, मागील सरपंच अपात्र झाल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदाचा भार उपसरपंच रवींद्र पवार सांभाळत होते. निवडणूक आयोगाने सरपंचपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम जाहीर केला व बुरंबाड गावाला हक्काचा सरपंच मिळाला आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून असलेल्या सुनीता लाखण गावच्या सरपंच झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमेश्वरचे नायब तहसीलदार गिरी उपस्थित होते. यावेळी उपसरपंच रवींद्र पवार, पोलिस पाटील मनस्वी शिंदे, ग्रामसेवक सच्चिदानंद म्हाडदळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुती गुरव, शिवसेनेचे विभाग प्रमुख माजी सरपंच मनोज शिंदे आदी उपस्थित होते. सुनीता लाखण यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 16/Dec/2025












