साडवली : संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित सकल वारकरी संघटन हेतू निमित्त ग्रंथ ग्रंथश्रेष्ठी श्री ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकिर्तन सोहळा देवरुख नजीकच्या पाटगाव येथील श्री क्षेत्र स्वयंभू सांब मंदिर येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ११ या वेळेत होणार आहे.
या दिवशी दिवसभरात सकाळी ९ ते ९.३० वा. वीणा व कलशपूजन, सकाळी ९.३० ते १२ वा. व्यासपीठ चालक ह.भ.प. संजय महाराज कांबळे यांच्याक डून ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ वा. महाप्रसाद, त्यानंतर सायं. ३ ते ४ यावेळेत सहविचार सभा, तर ४ ते ५ वा पाचांबे येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज भुरवणे यांचे प्रवचन होणार आहे.
५ ते ६.३० वा. सामुदायिक हरिपाठ, सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प. जय तुळसणकर यांचे हरिकिर्तन होणार आहे. रात्री ९ ते ११ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व वारकरी मंडळी आणि भक्त भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 16/Dec/2025














