खेड : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथील जाधव पेट्रोल पंपासमोर ११ डिसेंबर रात्री सुमारे ९.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विठोबा पांडुरंग साळुंखे (३८, रा. शिरवली सुतारवाडी, ता. खेड) असे मृताचे नाव आहे.
विठोबा साळुंखे हे राष्ट्रीय महामार्ग पायी ओलांडत असताना गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर वाहनाने (क्र. एमएच ०८ एपी ६९८९) त्यांना जोराची धडक दिली. वाहन चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
या धडकेत साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनिष मंगेश साळुंखे (वय २०, रा. शिरवली सुतारवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर चालक राजेश विजय मुकनाक (वय ३९, रा. उधळे खुर्द, मधलीवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 16/Dec/2025












