Chiplun : मुख्यमंत्री अभियानांतर्गत ओवळी येथे लोकसहभागातून बांधले बंधारे

चिपळूण : उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईच्या झळा जाणवू नयेत, तसेच पशुपक्ष्यांसह जनावरांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी तालुक्यातील ओवळी येथे लोकसहभागातून विविध ठिकाणी बंधारे घालण्यात आले.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील ओवळी येथे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांतर्फे लोकसहभागातून बंधारे घालण्यासाठी श्रमदान करण्यात आले.

यावेळी सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, सदस्य निकिता प्रकाश शिंदे, संपदा बोलाडे, दीपिका शिंदे, अंगणवाडी सेविका दीक्षा शिंदे. अनिता शिंदे, आशा सेविका सिद्धी शिंदे, रोजगार सेविका अक्षरा शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश शिंदे, ग्रामस्थ जयंत शिंदे, आबा कातुर्डे, शंकर कदम, संभाजी शिंदे, कौस्तुभ शिंदे, अनिश शिंदे, सुजल शिंदे, कल्पना शिंदे, प्रगती शिंदे, सरिता घाणेकर, दर्शना शिंदे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 16/Dec/2025