Rajapur : तळवडेत मधमाशी पालन प्रशिक्षणाला प्रतिसाद

पाचल : तळवडे ग्रामपंचायत, पितांबरी कंपनी आणि सुगंधी व समृध्द कोकण विकास मंचतर्फे तळवडे येथे आयोजित मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाचा लाभ एकूण ३४ प्रशिक्षणार्थीनी घेतला. तळवडे ग्रामपंचायत आणि पितांबरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या पुढाकाराने तळवडे मधाचे गाव हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मधमाशी आयासक प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चार दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. याचा लाभ एकूण ३४ प्रशिक्षणार्थीनी घेतला. या प्रशिक्षणामध्ये मधमाशी संगोपन, मध गोळा करणे, वेगवेगळ्या झाडांचे परागीकरण कसे निर्माण करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी पितांबरी कंपनीचे सुहास प्रभुदेसाई व दिलीप जाधव यांनी सर्वाचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 16/Dec/2025