दापोली : उपचार न पैशाअभावी मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये, या उद्देशाने दापोली उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भारत योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी दिली. रुग्णालयाच्या सरप्राईज पाहणीत त्यांनी ही घोषणा केली.
या पाहणीत रुग्णालयातील स्वच्छता व आहार व्यवस्था समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र तज्ज्ञ डॉक्टर, टेक्निशियन तसेच आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसलेले उपचार गरज भासल्यास खाजगी रुग्णालयात करून त्याचा खर्च शासनाकडून केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
१०० बेडच्या विस्तारित इमारतीचे काम संथगतीने सुरू असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगत अनुपस्थित आरोग्यमित्र सेवकावर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, श्रीराम ईदाते, अक्षय फाटक, संपदा पारकर, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 17/Dec/2025












