चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘उडान युवा मनाची २०२५’ हा सांस्कृतिक महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडीने महोत्सवाचा शुभारंभ, सकाळी १० वा. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी डॉ. तात्याराव लहाने व लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे (निवृत्त) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता एन.एस.एस. व एन. सी. सी.च्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच तिसरी घंटा नाट्य आविष्कार यामध्ये नावाजलेल्या एकांकिका सादर करण्यात येणार आहेत.
२२ डिसेंबर रोजी सांस्कृतिक विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण होईल. यावेळी अभिनेत्री, शास्त्रीय गायिका वेदवती केतकर -परांजपे, अभिनेत्री मयुरा पालांडे उपस्थित राहणार आहेत. २३ रोजी महाविद्यालयाचा ‘जिमखाना डे’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू आदित्य शिंदे व क्रिकेटपटू संतोष चव्हाण उपस्थित राहणार आहेत. २४ रोजी वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण होईल. यावेळी पुणे येथील सौरभ हिर्लेकर, विशाल चितळे उपस्थित राहाणार आहेत.
याचबरोबर या उडान २०२५ महोत्सवामध्ये एनसीसी मार्च, फूड स्टॉल, एकांकिका, फॅशन शो, विविध स्पर्धा, फनी गेम्स, फिश पाँट, दांडिया नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. प्राचार्य डॉ. माधव बापट व वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा. अनिल पुनवतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी निधी देवधर, नुपूर दिवाळे, राहुल शिंदे, श्रावणी भैरवकर, निशा आडविलकर, अनुष्का रोकडे, सुशील कांबळे, मारिया आंबेडकर, आर्या तांबे, ऋतांश कदम आदी परिश्रम घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 17/Dec/2025














