चिपळूण : गुढे-जोगळेवाडी येथील गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रूद्र पांडुरंग आग्रे यांच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून २५ लाखांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लवकरच आंग्रे यांच्या वारसांच्या बँक खात्यात ती जमा केली जाणार असल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांनी दिली.
गुढे-मोरेवाडी स्मशानभूमीजवळ रूद्र आग्रे यांच्या दुचाकीला गव्याने धडक दिली. गव्याने छातीत शिंग खुपसल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी गव्याचे केस व पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे आग्रे यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यानुसार वन विभागाने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली होती. या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे आणि विपुल कदम यांनी पाठपुरावा केल्याची माहिती चिपळूण शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख विक्रांत चव्हाण यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 17/Dec/2025












