दादासाहेब सरफरे महाविद्यालच्या १६ वा कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन

संगमेश्वर : येथील दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय विद्या संकुल क्रीडांगणात बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने दादासाहेब सरफरे कला क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन केले आहे.

२००६ पासून जल्लोषमय वातावरणात संपन्न होणा-या या कला क्रीडा महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. बुरंबी शिवने येथील संस्थेच्या विद्यासंकुलात दादासाहेब सरफरे क्रीडा नगरीत संपन्न होणा-या या जल्लोषमय महोत्सवामध्ये संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असून खो खो, कबड्डी, हॉलीबॉल व रस्सीखेच सारख्या मैदानी स्पर्धासह शालेय विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे..

गुरुवार दिनांक १८ ते शनिवार दिनांक २० डिसेंवर २०२५ या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये प्रथम दिवशी क्रीडा ज्योतीचे व सहभागी खेळाडूंचे लेझीम झांज पथकासह जल्लोषात देवी वाघजाई मंदिर तेर्ये येथून दादासाहेब सरफरे क्रिडा नगरीत आगमन होवून मान्यवरांच्या हस्ते उ‌द्घाटन मा. आमदार श्री शेखरजी निकम, (संगमेश्वर चिपळुण मतदार संघ), माजी राज्यमंत्री मा. श्री रविंद्रजी माने यांच्या शुभ हस्ते होणार आहे, यावेळी माजी जि.प. अध्यक्ष मा. श्री रोहन बने, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा संस्था संघाचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत, मा. श्री. विजय परीट (गटशिक्षणाधिकारी पं. स. देवरुख), औरंगबाद येथील प्रसिद्ध उद्योजक श्री संजय भाताडे यांचेसह पंचक्रोशीतील मा. सरपंच ग्रामपंचायत तेर्ये, कोसुंब, शिवने, लोवले. करंबेळे व मुचरी ग्रामपंचायत इ. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ४.०० वा. आयोजित पारितोषिक वितरण समारंभप्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने. तसेच श्रीम. अमृता साबळे (तहसिलदार, संगमेश्वर) डॉ. व्ही आर रायभोळे (वैद्यकीय अधिकारी, आयुष्यमान भारत प्रा. आ. केंद्र तेर्ये), संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरिक्षक श्री राजाराम चव्हाण इ. मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

दिनांक १९/१२/२०२५ रोजी आयोजित पारीतोषिक वितरण समारंभ सौ आसावरी संसारे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, रत्नागिरी), श्री उदय झावरे (पोलीस निरिक्षक, देवरुख पोलीस ठाणे), संगमेश्वर येतील प्रसिद्ध उद्योजक श्री प्रमोदजी अधटराव तसेच दादा सैतवडेकर यांचे शुभ हस्ते होणार आहे.

दिनांक शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम व राज्यस्तरीय विभागस्तरीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा कौतुक व बक्षीस वितरण समारंभ मा. आमदार किरण सावंत (लांजा राजापूर), वाशिष्टी मिल्क प्रोजेक्टचे चेअरमन मा. प्रशांतजी यादव, उद्योजक श्री श्रीपतजी शिंदे, सुरेशजी शिंदे, शंकरशेठ माटे व सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र चव्हाण इ. मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना व्यासपीठ मिळणार असून क्रीडा प्रेमी व शिक्षणप्रेमीनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी क्रीडा महोत्सवास उपस्थित रहावे असे अवाहन संस्था अध्यक्ष श्री दिलिप रावजी मोरे, उपाध्यक्ष विक्रांत यशवंत जाधव, उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई, सरचिटणीस श्री शरद गोविंद बाईत, सचिव ललितकुमार लोटणकर, खजिनदार महेश जनार्दन जाधव, शाळा समिती अध्यक्ष श्री दिनेश शामराव जाधव तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य श्री प्रकाश विरकर, पर्यवेक्षक श्री महावीर साठे व शालेय क्रीडा कला सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षक यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 17/Dec/2025