चिपळूण : तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण सावर्डे, संचलित डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच डेरवण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. या प्रदर्शनात टेरवच्या सुमन विद्यालयाने उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
उच्च प्राथमिक गटात (इयत्ता ६ वी ते ८ वी) सुमन विद्यालयाच्या विभावरी संतोष वास्कर (आठवी) व हर्ष विजय गावडे (आठवी) यांनी सादर केलेल्या “वृद्धांचा सोबती” या विज्ञान उपकरणाला चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी) तन्वी प्रदीप सागवेकर (इयत्ता दहावी) व प्रथमेश मनोहर मांडके (नववी) यांनी सादर केलेल्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या उपकरणालाही प्रथम क्रमांक मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:11 PM 17/Dec/2025












