Ratnagiri : जिल्हा पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांची वार्षिक उत्पन्न तपासणी होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला धान्य वाटप होत असते. यामध्ये काहींच्या घरी चारचाकी, बंगला, श्रीमंत असूनसुद्धा ते धान्य उचलत आहेत. विशेष म्हणजे उत्पन्न जास्त असूनसुद्धा रेशन कार्डावर उत्पन्न कमी दाखवून धान्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांचा शोध जिल्हा पुरवठा विभाग करीत आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी स्वतःहून उत्पन्नानुसार शिधापत्रिका घ्यावी, अन्यथा जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित लाभार्थ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातून विविध योजनांच्या माध्यमातून धान्याचे वितरण होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक श्रीमंत लाभार्थ्यांनी स्वतःची नावे चढवली आहेत. यातून रेशन दुकानाकडील धान्य उचल करणाऱ्या कार्डची संख्या वाढली आहे. धान्याचा कोटाही वाढवावा लागला आहे. मात्र आता धान्याची उचल करणारे प्रत्येक कुटुंब पात्र आहे का, याची पाहणी केली जात आहे. प्रत्येक तहसीलस्तरावर ही शोधमोहीम सुरू आहे. यात किती लाभार्थी पात्र आणि अपात्र आहेत हे समोर येणार आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील काही लाभाध्यर्थ्यांनी स्वतः हुन धान्य सोडले असून पांढरे रेशन कार्ड घेतले आहे.

लाखो शिधापत्रिकाधारकांची होणार तपासणी
धान्याचा लाभअंत्योदय, प्राधान्य कुटुंबासह इतर योजनातून घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा शोध सुरू आहे. लाखोहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. काहींच्या दारासमोर चारचाकी, बंगला, श्रीमंत असूनही काहीजण लाभ घेतात. अशांनी स्वतःहून धान्य सोडावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडून उत्पन्न पडताळणी करून पाहणे, त्यानुसार शिधापत्रिका योग्य आहे किंवा कसे हे ठरवणे कामकाज वर्षभर सुरूच असते. उत्पन्नानुसार शिधापत्रिका बदलून घ्या, जेणेकरून अधिक उत्पन्न असताना उत्पन्न कमी दाखवून जर तुम्ही अन्नधान्याचा लाभ घेतला असेल तर वसुली लागू शकते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी उत्पन्नानुसारच शिधापत्रिका घ्यावी- रोहिणी रजपूत,जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:19 PM 17/Dec/2025