रत्नागिरी : सध्या शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली सुरू आहेत. तसेच लग्नाचा हंगामही सुरू झाला आहे. त्यासाठी रत्नागिरीकरांनी लालपरीलाच पसंती दिली आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबर महिन्यानंतर लालपरी सुसाट धावत आहे. त्यामुळे १ डिसेंबर ते १६ डिसेंबर रत्नागिरी विभागातून आत्तापर्यंत शालेय सहलीसाठी ४७०, लग्न कार्यासाठी ५१ अशा एकूण ५२१ बसेस धावल्या. त्यातून रत्नागिरी विभाग मालामाल झाले असून तब्बल एक कोटी एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. जानेवारी महिन्यातही मोठ्या प्रमाणात लालपरीचे बुकिंग झाले असल्याचे सांगण्यात आले.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक, ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात येते. यंदा सहली या एसटी बसेसमधून आयोजन करा असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीतर्फे नवीन स्मार्ट बसेस ही देण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात तब्बल २०१ बसेस सहलीसाठी धावल्या होत्या.
त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळवून रत्नागिरी विभाग राज्यात तिसरे ठरले होते. त्यानंतर १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत सहल, लग्झ व इतर कारणासाठी तब्बल ५२१ एसटी बसेसचे बुकिंग झाले होते. कोकणासह इतर भागात लालपरी ही २ लाख ७९ हजार ९९० कि.मी धावली, तर लग्न व इतर कार्यासाठी तब्बल ५१ बसेस १४ हजार ९३० कि.मी धावल्या आहेत. त्यातून शैक्षणिक सहलीतून ९१ लाख २२ हजार ५६० रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर लग्न व इतर कार्यासाठी धावलेल्या बसेसमधून ९ लाख ८१ हजार १२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकंदरीत, रत्नागिरी विभागाच्या वतीने सहलीसाठी, लग्नकार्यासाठी विशेष पण नवीन स्मार्ट बसेसची सोय केली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सर्वाधिक उत्पन्न रत्नागिरी, चिपळुणातून
शालेय सहलीसाठी सर्वाधिक बुकिंग रत्नागिरी आगारातून ७३ बसेस बुकिंग झाल्या होत्या. त्यातून १५ लाख ४९ हजार १२० रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर चिपळूणमधून ९९ गाड्या आरक्षित होत्या. त्यातून १२ लाख ९२ हजार ४८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. सर्वांत कमी मंडणगड गाड्या बूक झाल्या होल्या. लग्न व इतर कार्यासाठी खेड १२, देवरूख येथे १० गाड्यांचे बुकिंग झाले होते. दोन्ही आगारांत जास्त उत्पन्न झाले.
रत्नागिरी विभागाच्या वतीने सहल, लग्न व इतर कारणासाठी विशेष बसची सोय केली होती. नवीन बसेस दिल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल १ कोटींहून अधिक उत्पन्न विभागाला मिळाले आहे. जानेवारी महिन्यासाठी बुकिंग सुरू असून शाळा, महाविद्यालयांनी संपर्क करून एसटी बसेस बुकिंग कराव्यात- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:26 PM 17/Dec/2025












