रेल्वे प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

चिपळूण : पनवेल ते केरळ असा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ५९ वर्षीय प्रौढाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. वालावलकर रुग्णालयात उपचारदरम्यान दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वा. ही घटना घडली. यामध्ये उन्नीकृष्णन अयप्पन टीपी (५९, रा. चिरूमीठ्ठाकोड, जि. पालकाड, केरळ) यांचा मृत्यू झाल आहे.

दि. १५ डिसेंबर रोजी उन्नीकृष्णन हे पनवेल ते केरळ असा रेल्वेने प्रवास करीत होते. या दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना चिपळूण रेल्वे स्थानकात उतरून उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दाखल करण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 AM 18/Dec/2025