चिपळुणात आज १३० ग्रामपंचायतींमध्ये मिशन बंधारे मोहीम

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या माध्यमातून मिशन बंधारे उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर एकाच दिवशी दि. १८ डिसेंबर रोजी १३० ग्रामपंचायतींमध्ये मिशन बंधारे मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या नियोजन संदर्भातील बैठक नुकतीच पंचायत समिती स्तरावर झाली. या मोहिमेंतर्गत्र एकाच दिवशी ५०० हून अधिक बंधारे बांधले जाणार आहेत. दरम्यान, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपचांयत पातळीवर ९ जिल्हा परिषद गटांमध्ये ९ खातेप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रमदान व लोकसहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि. प. वपं. स.चे माजी पदाधिकारी व सदस्य, उमेद समुहातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद केंद्रशाळा व स्थानिक विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय, ग्रा.पं. कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कच्चे बंधारे ८८, वनराई ३२, विजय बंधारे १३२ असे एकूण २५२ बंधारे बांधण्यात आले आहेत. आता एकाच दिवशी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ५०० हून अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 18/Dec/2025