Guhagar : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल

गुहागर : गुहागर तालुक्यातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गुहागर येथे दहावीचा क्लास आहे असे सांगून धोपावे येथील प्रितेश सुर्वे (वय २९) या मुलाबरोबर समुद्रावर फिरण्यास गेली. त्यानंतर शृंगारतळी येथे पिक्चर पाहूया असे सांगून दोघेही शृंगारतळी येथे आले. मात्र, टॉकीज बंद असल्याने पुन्हा गुहागर समुद्रकिनारी सुरूच्या बनात गेले. त्या ठिकाणी त्या मुलाने या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन संध्याकाळपर्यंत अतिप्रसंग केले. त्यानंतर गुहागरमधील एका नामांकित लॉजवर रात्रभर राहिले. त्या ठिकाणीही गुंगीचे औषध देऊन त्या मुलाने तिच्यावर अतिप्रसंग केला व सकाळी तिला घरपोच केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलगी घरी आली नाही म्हणून तिचे पालक व वाडीतील इतर मंडळी तिचा शोध संपूर्ण समुद्रकिनारी घेत होते. पहाटे तीन वाजेपर्यंत तिचा शोध घेण्यात आला व सकाळी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर घरून मुलगी घरी आल्याचा फोन आला. पालकांनी घरी जाऊन त्या मुलीला विश्वासात घेतले व संपूर्ण हकीगत त्या मुलीकडून विचारून घेतली. त्यानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन त्या मुलीने त्या मुलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 18/Dec/2025