मंडणगडात आजपासून ५३ वे विज्ञान प्रदर्शन

मंडणगड : पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड व लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर, लाटवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्याचे ५३ वे विज्ञान प्रदर्शन १८, १९, २० डिसेंबर २०२५ रोजी लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण येथे आयोजीत करण्यात आले आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार भाई जगताप, नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, अॅड. विनोद दळवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तहसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, गटशिक्षण अधिकारी कल्याणी मुळे, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तालुकावासीयांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 18/Dec/2025