दापोलीत दिव्यांगांसाठी ‘एकात्मिक दिव्यांग ओळखपत्र’ शिबिर

दापोली : दापोली तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एकात्मिक दिव्यांग ओळखपत्र, यूडीआयडी काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे होणार आहे.

या शिबिरात ज्या दिव्यांग नागरिकांनी अद्याप एकात्मिक दिव्यांग ओळखपत्र काढलेले नाही, तसेच ज्यांचे ओळखपत्र नूतनीकरण करावयाचे आहे किंवा मुदत संपलेली आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजना, सवलती व लाभ मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत आवश्यक असल्याने अधिकाधिक दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 18/Dec/2025